– नागरिकामध्ये भीतीचे वातावरण
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ नोव्हेंबर : गडचिरोली-धानोरा मार्गावरील दुधमाळा ते काकडयेली गावाजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नागरिकांना वाघाचे दर्शन झाले त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच काल रात्रो दुधमाळा येथील कृष्णकांत मनीराम मडावी यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. सदर घटनेने परिसरात वाघाचा वावर असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाघाने गाईवर हल्ला करून जखमी केल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन गायीचा पंचनामा केला . क्षेत्र सहायक डी.एस.आदे व वनरक्षक एन.एन. टोंगे यांनी रात्रोला जाऊन चौकशी केली असता गाय जखमी झाली होती. रात्र असल्यामुळे पंचनामा करण्यात आला नव्हता. गाय जखमी असल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन उपचार करण्यास सांगितले व दुसऱ्या १७ नोव्हेंबर ला मोक्यावर जखमी गाईचा पंचनामा करण्यात आला. क्षेत्र सहाय्यक यांनी मोक्यावर जाऊन पंचनामा केला असता त्या ठिकाणी बिबट्याचे पंजाचे ठसे आढळून आले. यावरून बिबट्याने हल्ला केला हे सिद्ध झाले. गाईला मागच्या बाजूला व जबड्याला गंभीर जखम होती . या बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे व नागरिकांचे सकाळी फिरायला जाणे सुद्धा बंद झाले आहे. ही घटना गावाला लागून असलेल्या जंगलात कक्ष क्रमांक ४६५ मध्ये घडून आली. जेव्हा घटना घडली तेव्हा सर्व लोक जागे होते. त्यामुळे गायीचे प्राण वाचले. दुपारी बारा वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी केळवतकर यांनी मोका स्थळाची पाहणी केली.
