धानोरा : स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त जे. एस .पी. एम . महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

239

The गडविश्व
ता. प्र /धानोरा, १९ नोव्हेंबर : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा धानोरा येथील श्री जे एस पी एम महाविद्यालयांमध्ये स्वर्गीय रमेशचंद्र मुनघाटे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौहान हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे धानोरा चे सामाजिक कार्यकर्ते सोपानदेव मशाखेत्री हे होते तर महाविद्यालयातील प्रा. डॉ राजु किरमिरे, प्रा. डॉ पंढरी वाघ, प्रा. डॉ दामोदर झाडे, प्रा. ज्ञानेश बनसोड, डॉ. विना जांबेवार, डॉ लांजेवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री साईबाबा व प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली यानंतर ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ.लांजेवार यांनी प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जीवन कार्यावर व त्यांना आलेला अनुभव त्यांनी कथन केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भावगीत गाऊन मान्यवरांचे मन जिंकले. यावेळी मान्यवरांनी आपल्या कार्यक्रमात आपल्या भाषणातून प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते धानोरा चे सोपानदेवजी मशाखेत्री यांनी प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना रमेशचंद्र मुनघाटे यांनी धानोरा येथे सुरु केलेली वरिष्ठ महाविद्यालय व यासाठी लागणारे विद्यार्थी यासाठी त्यांनी परिश्रम घेतले असे सांगितले. सोपानदेव मशाखेत्री यांनी महाविद्यालय स्थापनेपासून आपला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आलेला आहे असे सांगितले. धानोरा येथे शैक्षणिक वातावरण निर्माण करून प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला बहर आणलेला आहे या महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होवोत असे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करत असताना विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याच पद्धतीने रासेयो विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस महाविद्यालयाचे प्रा.डॉ. मुरकुटे, प्रा. डॉ. गोहणे, प्रा.डॉ. धवनकर, प्रा. डॉ.चूधरी, प्रा.मातेंस तोंडरे, प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार, डॉ. प्रियंका पठाडे, गीताचंद्र भैसारे, प्रा. धाकडे, प्रा. खोब्रागडे, प्राध्यापीका निवेदिता वटक मॅडम, प्रा.करमनकर, प्रा. रणदिवे, प्रा. आवारी व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. गणेश चुदरी तर आभार डॉ. विना जम्बेवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here