सहकारी संस्थांकडुन होणारी शेतकऱ्यांची गळचेपी थांबवा : सचिन खरकाटे

267

The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २० नोव्हेंबर : धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान शासकिय दराने विक्रीसाठी सहकारी संस्थांच्या गोदामात नेले असता सहकारी संस्थेकडुन २५ रुपये हमाली व २५ रुपये गोदाम भाडे प्रतिक्विंटल प्रमाणे वसुल करुन सहकारी संस्था शेतकऱ्यांची गळचेपी करत आहेत या संस्थांची चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही सह संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे निवेदन देसाईगंज न.प. चे माजी सभापती सचिन खरकाटे यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले.

देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची धान मळणी सुरु झाली असुन शेतकऱ्यांनी धान विक्री करिता शासकिय हमी भावाचा व बोनसचा लाभ मिळावा यासाठी नोंदणीकृत संस्थेत धान विक्रीसाठी नेले असता धान खरेदी विक्री सहकारी संस्था शेतकऱ्यांकडुन हमाली २५ रुपये व गोदाम भाडे २५ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वसुल करत आहेत राज्य सरकार या संस्थांना गोदाम भाडे हमाली खर्च व अनुदान देत असतांनाही या संस्था शेतकऱ्यांकडुन प्रति क्विंटल ५० रुपये अतिरीक्त घेवुन शेतकऱ्यांची गडचेपी करीत आहेत या विषयी जिल्हा पणन अधिकारी यांना फोन करुन सांगण्याचा प्रयत्न केले असता ते फोनही उचलत नाही आधिच ओल्या दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडुन अन्यायकारक ५० रुपये प्रति क्विंटल वसुल करणे अयोग्य असुन या संस्थांची चौकशी करुण त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही सह नोंदणी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन गडचिरोली चे अतिरिक्त जिल्हाधीकारी समाधान शेंडगे यांना देसाईगंज न. प. माजी सभापती सचिन खरकाटे यांनी सादर केले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष श्याम उईके, सचिन वानखेडे उपस्थित होते .

– शेतकऱ्यांकडुन नियमबाह्य पद्धतीने पैसे घेणे अयोग्य आहे. दोन दिवसात सदर तक्रारी संदर्भात चौकशी करुन दोषी संस्थांवर कार्यवाही करण्यात येईल.

– समाधान शेंडगे
निवासी उपजिल्हाधीकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here