महानिर्मितीला आर्थिक कडकी, बँकेकडून काढणार दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज

267

– राज्य सरकार देणार थकहमी
The गडविश्व
मुंबई : कोरोना महामारीचा मोठा फटका सर्वसामान्यांबरोबरच उद्योग व्यसायांनाही बसला आहे. राज्याला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी पुरेशी वीजनिर्मिती करण्याची जबाबदारी असलेल्या महानिर्मितीलाही आर्थिक कडकी लागली आहे. वीज प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच कोळसा खरेदीचे थकीत पैसे चुकते करण्याठी महानिर्मिती बँक ऑफ बडोदाकडून तब्बल दोन हजार कोटी रुपये कर्ज घेणार आहे. त्याला राज्य सरकार थकहामी देणार आहे.
महानिर्मितीची एकूण वीजनिर्मिती क्षमता सुमारे 13 हजार मेगावॅटच्या घरात असतानाही सुरुवातीच्या लॉकडाऊनमध्ये मागणी कमी असल्याने तीन-चार हजार मेगावॅट एवढय़ा कमी प्रमाणात वीजनिर्मिती करावी लागत होती. मात्र देखभाल-दुरुस्ती, दैनंदिन ऑपरेटिंग खर्च करावा लागत असल्याने महानिर्मितीची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. तसेच लॉकडाऊन काळात महावितरणच्या वीज बिलाची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे महावितरणकडून येणे असलेले विजेचे पैसेही मिळालेले नाहीत. त्यामुळे महानिर्मितीची आर्थिक कडकी झाली आहे. तसेच खरेदी केलेल्या कोळशाचीही शेकडो कोटी रुपयांची बिल थकीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने बँक ऑफ बडोदाकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here