गाव संघटनेच्या मागणीनुसार तीन गावांमध्ये शिबीर

150

– ४२ जणांवर उपचार, मुक्तीपथचे सहकार्य
गडविश्व
गडचिरोली, २१नोव्हेंबर : गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथ अभियानाच्या मार्फतीने तीन गावांमध्ये व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून गाव खेड्यातील एकूण ४२ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला आहे.
सिरोंचा तालुका येथे कंबलपेठा येथील शिबिरात १३ रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते पार्वती येरोला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. नियोजन मुक्तीपथ तालुका चमूने केले. एटापल्ली तालुक्यातील कोठी (हालेवारा ) येथेही गाव संघटनेच्या मागणीनुसार शिबिर घेण्यात आले. यावेळी १८ रुग्णांना उपचार देण्यात आला. रुग्णांची नोंदणी तालुका संघटक किशोर मलेवार, रुणाली कुमोती यांनी केली. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ कार्यकर्ता रवी वैरागडे यांनी केले .हे शिबिर यशस्वी करण्याकरिता गावातील पाटील लींगा पांडू किरंगा, अंगणवाडी सेविका वारली मादी कीरंगा तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले. दोन्ही शिबिरांमध्ये रुग्णांची केस हिष्ट्री पूजा येल्लूरकर यांनी घेतली तर समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले. तसेच चामोर्शी तालुक्यातील खंडाळा येथे आयोजित शिबिरामध्ये २१ रुग्णानी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. शिबीराचे नियोजन संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सीडाम यांनी केले. समुपदेशन छत्रपती घवघवे यांनी केले. यशस्वीतेसाठी अभिमन्यू सहारे, राजू सहारे, आबाजी सातपुते, ज्योती सहारे, किशोर कोसरे, यशवंत सहारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here