– सुगंधित तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असताना जिल्ह्यात कोणत्या मार्गाने पोहचतो ?
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २१ नोव्हेंबर : सुगंधित तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ विक्री वर बंदी असतांना गडचिरोली जिल्ह्यात सर्रासपणे सुगंधित तंबाखू येत असून त्यावर पायबंद घालणार काय ? तो कोणत्या मार्गाने जिल्ह्यात पोहचतो ? अशे अनके प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्ह्यातील आरमोरी व वैरागड येथुन खर्रा मध्ये वापराला जाणारा सुगंधित तंबाखु गडचिरोली जिल्ह्यात व लागुनच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात पुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या तंबाखुचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात मोठ – मोठे नेटवर्क परसरले असुन यांचा केंद्रबिंदू आरमोरी आहे अशी माहिती आहे.
ईगल, मजा, हुक्का अशा विविध नावांनी ओळखला जाणारा सुगंधित तंबाखू किरकोळ व्यावसायीक व किराणा दुकानदारांना सुखरुप पोहचता केला जात आहे. हा व्यवसाय चालविणारा कोण ? सामान्य माणसाच्या जीवनाशी कोण खेळ खेळतो ? यावर पायबंध कोण घालणार ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच मी तो नव्हेच अशी भूमिका काही जण घेत सर्रास बिनबोभाटपणे पुरवठा चालु ठेवला आहे. जर हा प्रकार चालू नसेल तर किरकोळ दुकानदार यांच्याकडे सुगंधित तंबाखु येतो कुठून असाही प्रश्न उपस्थित होतो. या बाबतीत संबंधित प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळत असलेल्या त्या तस्करांना पायबंद घालण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी सर्वंच स्तरांवर केली जात आहे.
सुगंधित तंबाखु येतो कुठून ?
जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अवैध धंद्यांवर अंकुश लावत आहेत. मात्र सदर सुगंधित तंबाखु येतो कुठून ? पोलीस यंत्रणांना हुलकावणी देत जिल्ह्यात सुगंधित तंबाखुचा पुरवठा केला जातो काय ? पोलीस यंत्रणा सुगंधित तंबाखूची तस्करी रोखण्यास अपयशी ठरत आहेत काय ? जिल्ह्यातील प्रत्येक सीमेवर पोलीस ठाणे असतांना या होणाऱ्या तस्करीकडे कानाडोळा होतो काय ? असे विविध प्रश्न उपस्थित होत असून अनेकदा पोलीस प्रशासनाने सुगंधित तंबाखू तस्करी होत असतांना अंकुश लावले आहे मात्र पुन्हा सर्रासपणे सुगंधित तंबाखुची विक्री व जिल्हाभरात पुरवठा होत असल्याचे दिसून येत असून यावर पायबंद घालणार काय ?
कोणत्या राज्यातून येतो माल ?
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या सीमा आहेत. छत्तीसगड राज्यातून अनेकदा सुगंधित तंबाखुची तस्करी करतांना कारवाई करण्यात आली होती. आरमोरी तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. अनेकदा छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ – मोठे मालवाहू ट्रकांची वाहतूक सुरु असते. छत्तीसगड मार्गे जिल्ह्यात सुगंधित तंबाखुची तस्करी करतांना कारवाई करण्यात आली होती त्यामुळे पुन्हा एकदा छत्तीसगड राज्यातूनच सुगंधित तंबाखुची तस्करी होत असावी असा तर्कही लावण्यात येत आहे.
#gadchiroli #crime news #tambakhu #gadchirolinews #chattisagadh #sugandhit #armori #Crime #news