– जिओ वर्ल्ड कन्वेनशन सेंटर कुर्ला मुंबई येथे ४ दिवसीय आंतरराष्ट्रीय समारोहाचे आयोजन
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज , २१ नोव्हेंबर : जिओ वर्ल्ड कन्वेनशन सेंटर कुर्ला मुंबई येथे १८ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या २१ वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटस २०२२ या ४ दिवसीय आंतरराष्ट्रीय समारोह कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील नागीलवार अँड असोसिएटचे प्रोपरायटर CMA श्रीकांत व्यंकटी नागीलवार हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थापित प्रमाणित लेखापाल आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित तसेच विशेष अतिथी म्हणून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटट प्रेसिडेंट एल.एन. जॉन्सन (Mr.L. N. Johnson ), प्रेसिडेंट ICAI डॉ. देवशिष मित्रा, वित्त मंत्री निर्मला सीतारामन प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात एकूण ६००० निमंत्रित मान्यवर उपस्थित असून त्यापैकी १८०० मान्यवर हे विविध देशांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित झाले आहेत. हा कार्यक्रम गतवर्षी ऑस्ट्रेलिया मधील सिडनी या शहरात आयोजीत करण्यात आला होता. व या वर्षी हा बहुमान भारत देशाला प्राप्त झाला. नागीलवार यांनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील लाभलेल्या प्रसंगाला त्यांनी धन्य व्यक्त केले असून सर्वांचे आभार सुद्धा व्यक्त केलेले आहेत.
सदर कार्यक्रम ४ दिवस चालणार असून सदर कार्यक्रमात मुकेश अंबानी, गौतम अडाणी, रामदेव बाबा यांची सुद्धा उपस्थिती लाभणार आहेत. सदर कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेखापाल तसेच अनेक मोठ्या आणि नामवंत कंपनी चे प्रतिनिधी चे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहेत.
#nagilwar #desaiganj #gadchirolinews #shrikantnagilwar #jio