– जय सेवा क्लब गोलाकर्जी यांच्या वतीने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी, २३ नोव्हेंबर : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अतंर्गत येणाऱ्या गोलाकर्जी येथे जय सेवा क्लबच्या वतीने भव्य व्हलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे उदघाटन नुकतेच जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दुसरा पारितोषिक माजी पं.स सभापती भास्कर तलांडे व तिसरा पारितोषिक डॉ.बिश्वास व रिया देवगण असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे.
उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सभापती भास्कर तलांडे होते. यावेळी मंचावर माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, खांदलाचे उपसरपंच राकेश सिडाम, अँड. एच.के आकदर, माजी सरपंच, लक्ष्मीताई श्रीरामवार, ग्राम पंचायत सदस्य जयवंता गोलेटीवार, जोती आलाम, अहेरीचे नगरसेवक महेश बाकेवार, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी ग्रा.प.सदस्य सुधाकर आत्राम, लक्ष्मण डोंगरे, डॉ.बिश्वास, बिचू मडावी, मूत्ताजी पोरतेट, रमेश पोरतेट, दिपक अर्का, रघुनाथ मडावी, राकेश सोयाम, बुचया सड़मेक, सुरेश पेंदाम होते.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार रमेश बामनकर यांनी मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चिरंजीव वेलादी, उपाध्यक्ष रितिक सड़मेक, अजय वेलादी, संतोष पोरतेट, सूरज सिडाम, केशव सड़मेक व गावातील पुरुष, महिला, खेळाडू उपस्थित होते.
#ajay kankadalwar # Volleyball #aheri # gadchiroli #khandala #gadchiroli news