The गडविश्व
मुंबई : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्याच्या 24 तासांमध्येच विराटने टेस्ट कॅप्टन्सीही सोडली आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपण टेस्ट टीमचे नेतृत्व सोडत असल्याले सांगितले आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा वाद सुरू आहे. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआदी त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विराट कोहलीला आम्ही टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असे सांगितले होते, पण तो ऐकला नाही. यानंतर निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटची वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हकालपट्टी करण्यात आली, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले.