जि. प. माजी अध्यक्ष.अजय कंकडालवार यांच्या हस्ते देवलमरी येथे समाज मंदिराचे भूमिपूजन

256

The गडविश्व
अहेरी, २४ नोव्हेंबर : देवलमरी येथे जि. प. माजी अध्यक्ष.अजय कंकडालवार यांच्या हस्ते भोई समाज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
देवलमरी येथे भोई समाज जास्त संख्यने वास्तव्यास आहेत. मात्र समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी परंपरा,चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व कार्यक्रम घेण्यासाठी समाजाचे समाजभवन नसल्याने अडचण भासत होती. भोई समितीच्या नागरिकांनी जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व आम्हाच्या समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल म्हणून या उद्देशाने समाज बांधव जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडे नागरिकांनी निवेदन देवून समाज भवनाची मागणी केली होती.
तसेच निवेदन स्विकारताना शब्द दिले होते कि आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करत आले असून देवलमरी येथे भोई समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक आहे. येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषदेच्या निधीतून समाज मंदिर मंजूर केले असुन काल सदर समाज भवनाचे भूमिपूजन जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देवलमारी ग्रा.प.सदस्य महेश लेकुर, ग्रा.प.सदस्य लक्ष्मण आत्राम, ग्रा.प.सदस्या संजूबाई आत्राम, ग्रा.प.सदस्या विमल कुर्री, संजू बोंडे, येलाय्या तोकला, शंकर गाणला, रमेश तोकला, सत्यम मचारला, नंदू तोकला, शंकर तोकला, अंकुलू तोकला, सत्यम तोकला, गगुलू तोकला, सभय्या तोकला, मुत्तय्या मंचर्ला, पोषय्या गाणला, चंद्रय्या गाणंला, मधुकर गाणला, जोगय्या तोकला, किशोर तोकला, हरीष गाणला, शैलेश तोकला, राकेश तोकला, मधुकर तोकला तसेच गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

#Ajay Kankadalwar #Aheri #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here