उद्या आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन व स्थापना दिनानिमित्त रॅली

194

The गडविश्व
गडचिरोली, २५ नोव्हेंबर : आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संविधान दिनानिमित्त तसेच आम आदमी पार्टीचा दहावा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात उद्या २६ नोव्हेंबर २०२२ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्ली आणि पंजाब मध्ये बहुमताच्या जोरावर सुरू असलेले यशस्वी सरकार सर्व सामान्य जनतेला न्याय देत असून विज,पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेले सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी पार्टीचे प्रयत्न आहे. तसेच पार्टीचा दहावा वर्धापनदिन दिन व संविधान दिन‌‌‌ उत्साहात साजरा करण्यासाठी बहु संख्येने हजर राहावे असे आम आदमी पार्टी तर्फे जनतेला आवाहन करण्यात येत आहे. आप कार्यालय कॅम्प एरीया ते इंदिरा गांधी चौक ते रेड्डी गोडाऊन ते पार्टी कार्यालय असा रॅलीचा मार्ग राहणार असून पार्टी कार्यालयात समारोप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here