The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २५ नोव्हेंबर : तालुक्यातील नवीन रांगी येथे भक्तिमय वातावरणात श्री.तुकडोजी महाराज पुण्यतिथी चे औचित्य साधून गावात रामधुन काढून सामुदायिक प्रार्थना करुण २४ नोव्हेंबर २०२२ ला पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
नवीन रांगी येथिल हनुमान मंदिरात तिन दिवस सकाळी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर ध्यान करण्यात आले. सकाळी गावात रामधून काढून भक्तिमय वातावरण निर्माण करुण रात्रोला भजन गायन करुण गोपाल काल्याचा कार्यक्रम करुण, गुरुदेवास श्रंद्धांजली वाहण्यात आली व आनंदात पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी मोंगरकर, सोरते, जुवारे, कुकडकर, कुनघाडकर, शालिकराम कावळे, पुरुषोत्म इनकने, भुरसे, चापडे, सुधाकर रोहनकार, प्रभाकर सोनटक्के, बैस, नैताम आणि गावकरी उपस्थित होते.