The गडविश्व
गडचिरोली, २५ नोव्हेंबर : जि.प. उच्च प्राथमिक शाळा जेप्रा येथे मुख्याध्यापक प्रकाश रासेकर व शिक्षिका सौ. कुंदा कांबळे यांचा सेवानिवृत्तीपर् सत्कार आज २५ नोव्हेंबर रोजी करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकला झंजाड, विशेष अतिथी माजी पं.स. सदस्य नेताजी गावतुरे, सत्कारमुर्ती प्रकाश रासेकर, सविता रासेकर, कुंदा कांबळे, प्रमुख अतिथी माजी उपसभापती मनोहर पाटील झंजाड, उपसरपंचा कुंदा लोणबले, शा.व्य.स अध्यक्ष विनोंद भांडेकर, शा.व्य.स. उपाध्यक्ष किशोर नरुले, शा.व्य.स. सदस्य ईश्वर बावणे, ग्रा.पं. सदस्य दिलिप गावतुरे, ग्रा.पं. सदस्या सुवर्णा कोडाप, ग्रा.पं. सदस्या सोनाली गोवर्धन,ग्रा.पं. सदस्या जास्वंदा निकुरे, मुख्याध्यापक आशिष बांबोळे, समीर भजे, आशा हर्षे, माया भैसारे, मॅजिक बस चे लेखाराम हुलके, रीना बांगरे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कारमुर्तीचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवारांनी, सत्कारमुर्तिनी, शिक्षक व विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रस्ताविक आशिष बांबोळे, संचालन कु माया भैसारे व आभार कु.आशा हर्षे यांनी मानले. यावेळी रासेकर व कुंदा कांबळे यांनी शाळेला भेटवस्तू दिल्या.