The गडविश्व
सिरोंचा, २६ नोव्हेंबर : तालुका काँग्रेस कमिटी तर्फे संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्प व मालार्पण करून तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार पी.आर.तालांडी, काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, माजी नायब तहसीलदार जेष्ठ कांग्रेस नेते शंकर पुप्पालवार, अहेमद अली, अब्दुल सलाम, पोचम अंकुदारी, बनाय्या मंचरला, माजिद अली, शेख जलील तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधि श्रीमती. सुगुनाताई तलांडी, युवा कांग्रेस जिल्हा सचिव श्रीमती. नवशद हैदर शेख, महिला तालुका अध्यक्ष श्रीमती. तिरुमला दासरी, माजी सरपंच श्रीमती. मसनुरी रत्नामाला, आदी कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.