The गडविश्व
गडचिरोली, २९ नोव्हेंबर : जिल्हा परिषद शिक्षण प्राथमिक विभाग गडचिरोलीच्या वतीने आज मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारzp वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळा सन २०२२-२३ या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषद हायस्कुल (मा.शा.) चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेले आहे .
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)
गडचिरोली जिल्ह्यातील आर्दश शिक्षकाची निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये
प्राथमिक विभाग
शकवळू नागोजी बावणे जि. प. शाळा जोगणगुडा (अहेरी पं.स.)
पुंडलिक यशवंत देशमुख जि. प .प्राथमीक शाळा सुवर्णनगर (आरमोरी पं.स.)
धनराज श्रावण पोरटे जि. प. शाळा राणीपोडूर (भामरागड पं.स.)
शंकर अमूल्य मंडल जि. प. केंद्र शाळा रामकृष्णापूर चामोर्शि (पं.स.)
महेंद्र नथू शहारे जि. प. प्राथमीक शाळा कोकडी (देसाईगंज पं.स.)
विनोद शिवाजी रायपुरे जि .प. प्राथमीक शाळा गट्टा (धानोरा पं.स.)
मांतय्या चिन्नी बेडके जि. प .प्राथमीक शाळा जरावंडी (एटापल्ली पं.स.)
प्रभाकर कोठारी जि. प .उच्च प्राथमिक शाळा पोर्ला (गडचिरोली पं.स.)
श्रीमती त्रिवेणी सदाशिव गायकवाड जि. प .प्राथमीक शाळा जांभळी (कोरची पं.स.)
लीलाधर हरीजी वाढई जि. प. प्राथमीक शाळा चिचटोला (कुरखेडा पं.स.)
मधुकर भाऊजी वनकर जि. प. प्राथमीक शाळा मल्लेरा (मुलचेरा पं.स.)
कुमारी. सपना आकुलवार जि. प .प्राथमीक शाळा मेडाराम (सिरोंचा पं.स.).
माध्यमिक विभाग
रामपद कालिपद सरकार जि .प .हायस्कूल चामोर्शी (चामोर्शी पं.स.)
प्रमोद लालाजी रामटेके जि. प. हायस्कुल एटापल्ली (एटापल्ली पं.स.)
पुरस्कार प्राप्त होणाऱ्या शिक्षकांनी नियोजित ठिकाणी सपत्नीक उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक गडचिरोली यांनी केले आहे.
(Z P Gadchiroli ) (Gadchiroli news Updat)