– कोरची येथील शासकिय आश्रम शाळेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १ डिसेंबर : शाळेपासून १०० यार्ड परिसरात सुरू असलेल्या किराणा दुकान व पानटपरी चालकांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्यासंदर्भातील पत्र शासकीय आश्रम शाळा कोरची, शाळा व्यवस्थापन समिती व मुक्तीपथ अभियानाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करतांना आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कोटपा २००३ कायद्यानुसार कारवाई करण्याचेही सांगण्यात आले आहे.
कोरची येथील आश्रम शाळा १०० टक्के तंबाखूमुक्त करण्यासाठी पालक व शिक्षकांची बैठक घेण्यात आली. शाळेतील कोणताही विद्यार्थी खर्रा, तंबाखु, गुडाखु खाउ नये याकरीता पालकांना जागृत करण्यात आले. मुक्तीपथ तंबाखु मुक्ती सैनिक समीती सदस्य निवड करण्यात आली. त्यांनतर शाळा परीसर जवड असलेल्या किराणा दुकान आणी पानटपरी चालकांना तंबाखुजन्य पदार्थ विक्री बंदीचे विद्यार्थी, पालक शिक्षक यांच्या माध्यमातुन पत्र देण्यात आले. सोबतच कोटपा कायद्याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही सांगण्यात आले.
यावेळी शाव्यस अध्यक्ष हिरालाल उईके , उपाध्यक्ष मनिराम मडावी ,मुख्याद्यापक यु.यु.ढोक , तालुका संघटक निळा किन्नाके, सरपंच तथा पालक मोहन कुमरे , स्पार्क कार्यकर्ता सुभम बारसे, नोडल आफिसर ए.एन.कायंदे, प्रेमिला होळी, गीता कुमरे, एस.के.शेंडे व्हि.व्ही.मडावी, टि.आर.भोयर, एस.एन.झोडगे, के.एच.गेडाम, मनिषा बोगा, क्षय काटेंगे, संतु बागमुळ, तिलोचन बागमुळ, दिनेश आडुलवार यांच्यासह पालक उपस्थित होते.

(Muktipath) Gadchiroli News Update) (Gadchiroli) (korchi)