– दोन कांस्य पदक पटकाविले
The गडविश्व
गडचिरोली, ३ डिसेंबर : अकोला येथे २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ९१ वी वरीष्ठ पुरुष राज्य स्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत गडचिरोली बॉक्सिंग केंद्राचे दोन खेळाडू अक्षयकुमार कोवासे व पारस राऊत यांनी आपल्या खेळाचा उत्कृष्ठ प्रदर्शन करत गडचिरोली जिल्हाला दोन कांस्य पदक पटकावून दिले.
अक्षयकुमार कोवासे याने ५१ किलो वजन गटात पहिल्या लढतीत मुंबई उपनगरच्या बॉक्सरला 5-0 ने गार करत विजय मिळविला, दुसऱ्या लढतीत औरंगाबाद सिटीला पहिल्या राउंड मध्ये बाद करत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला, तर पुणे जिल्हाच्या बॉक्सर सोबत सेमी फायनल लढतीत उत्कृष्ठ कामगिरी करत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पारस राऊत याने ९२ किलो वजन गटात पहिल्या लढतीत PCMC च्या बॉक्सरला पहिल्या राऊंड मध्ये गार करत विजय मिळविला, दुसऱ्या लढतीत चंद्रपूर सिटीला पहिल्या राउंड मध्ये बाद करत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला, तर मुंबई जिल्हाच्या बॉक्सर सोबत सेमी फायनल लढतीत उत्कृष्ठ कामगिरी करत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले
त्यांच्या या यशाबद्दल बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, सचिन यशवंत कुरुडकर जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार, रोहित वैष्णोई यांनी शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडू जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, संतोष गैनवार, निखिल इंगडे, प्रवीण मेश्राम, सुरज खोब्रागडे, संजय मानकर सर्वानी अभिनंदन केले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Two players from Gadchiroli Boxing Center shine in senior men’s state level championship boxing tournament )