The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३ डिसेंबर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव येथे पार पडले. त्या स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल माळंदा च्या चमु १४ वर्ष वयोगट कबड्डी मुले, १७ वर्ष मुले गट, मुले- मुली खो- खो १७ वर्ष वयोगट मुले व मुली खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले आहे.
विजय संघाचे अबू झमाड शिक्षण मंडळाचे सचिव. प्राचार्य एस.एम.पठाण, प्राचार्य लीना हकीम, मुख्याध्यापक बढाई, क्रीडा शिक्षण धुळसे, शिक्षिका अंजुम शेख यांनी अभिनंदन केले आहे. विजेत्या संघाने आपल्या यशाची श्रेय शिक्षक- शिक्षकेतर व पालकांना दिले.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Dhanora)