मोहल्ला क्लिनिकतुन ३२ जणांवर उपचार

263

The गडविश्व
गडचिरोली, ३ डिसेंबर : गडचिरोली, देसाईगंज, सिरोंचा व मूलचेरा शहरातील विविध वॉर्डामध्ये आयोजित मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून ३२ रुग्णांवर उपचार करण्यात आला. रुग्णांना औशोधपचारासह समुपदेशन करण्यात आले.
गडचिरोली शहरातील विसापूर वॉर्डात आयोजित मोहल्ला क्लिनिकला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १५ रुग्णांनी उपचार घेतला. वडसा शहरातील आंबेडकर वॉर्ड येथे मोहोल्ला क्लिनिक घेण्यात आले. यामधे ४ पेशंटनी उपचार घेतला. सिरोंचा शहरातील वार्ड न ४ येथे आयोजित मोहल्ला क्लिनिकतुन ७ व मुलचेरा शहरातील मोहल्ला क्लिनिकमध्ये ६ अशा एकूण ३२ रुग्णांवर उपचार करण्यात आला.
शहरातील विविध वार्डातच मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेणे रुग्णांना सोयीस्कर ठरत आहे. यात रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम पटवून दिले जात आहे. सोबतच दारूची सवय कशी लागते, धोक्याचे घटक, नियमित उपचार घेणे आदींची माहिती देत रुग्णांना समुपदेशन देखील करण्यात आले. या माध्यमातून उपचार घेत अनेकांनी दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here