गडचिरोली : न्यायालयाच्या गेटला गळफास लावून तरुणीची आत्महत्या

2354

-आत्महत्येचे कारण अस्पष्ट, परिसरात खळबळ
The गडविश्व
ब्रम्हपुरी, ६ डिसेंबर : येथील नवीन कोर्टाच्या इमारतीच्या गेटला तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे . सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पौर्णिमा मिलिंद लाडे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव (चोप) येथील असल्याचे कळते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकते नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.

(The Gadvishva) ( Gadchiroli) (Chandrapur News Updates) (Bramhapuri) (suiside)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here