– गडचिरोली पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, ११ डिसेंबर : तालुक्यातील विहिरगाव जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून दारूविक्रेत्यांचा ८० हजारांचा १० ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
विहिरगाव येथे गावकऱ्यांच्या पुढाकारातून मागील दोन वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, आताच्या घडीला अवैध विक्री केली जात आहे. या गावातील विक्रेत्यांच्या माध्यमातून राखी, मेंढा, गडचिरोली, हिरापुर, येवली या गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. अशातच जंगलपरिसरात हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली असता, मोहफुलाचा सडवा आढळून आला. घटनास्थळी असलेला जवळपास १० ड्रम मोहफुलाचा सडवा, साहित्य असा एकूण ८० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी शिवदास दुर्गे यांनी केली. यावेळी तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.
(The Gadchiroli) (Gadchiroli News Updates) (Muktipath)