गडचिरोली : आजपासून कृषी महोत्सवास सुरुवात

643

– बचत गटांचे प्रदर्शन व उत्पादन विक्री
The गडविश्व
गडचिरोली, १२ डिसेंबर : जिल्हयातील कृषि व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभूत व शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होण्याचे उद्दिष्ठ ठेवत आज १२ डिसेंबर पासून ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजनकृषी महाविद्यालय सोनापूर कॉम्प्लेक्स, मूल रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
या कृषी महोत्सवात आत्मा, माविम व उमेद मार्फत बचत गटांचे प्रदर्शन व उत्पादन विक्री देखील ठेवण्यात आले असून जिल्हयात कृषि क्षेत्रात काम केलेल्या प्रगतशिल व उदयन्मुख शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. या कृषी महोत्सवात कृषि व कृषि संलग्न उत्पादनाची कृषि पुरक उत्पादकांनी विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल लावण्यात येणार आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान व व त्याविषयी माहिती या महोत्सवातून अवगत करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here