वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

2219

– परिसरात दहशत
The गडविश्व
ता.प्र / चिमूर, १३ डिसेंबर : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या माणेमोहाळी येथील शेतशिवारात वाघाने बैलावर हल्ला करुन ठार केल्याची घटना मंगळवार १३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चेतन जांभूळकार यांच्या मालकीचे ते बैल होते.
नेहमी प्रमाणे बैल झोपडीत बांधून होते. दरम्यान वाघाने बैलावर हल्ला करून ठार केले व जवळच असलेल्या शेतशिवारत नेऊन भक्ष केले. सदर घटना ही मध्यरात्री १२ ते ०१ वाजताच्या सुमारास घडली असावी असा अंदाज आहे. नजीकच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्याने परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे. जंगली डुकरांनी तर हैदोस माजवत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे सत्र सुरूचआहे. परिसरात वाघाचाही वावर असून काही दिवसांपूर्वी वाघाचे पंजे नागरिकांना निदर्शनास आल्याचे कळते. मध्यरात्री वाघाने बैलाला ठार केल्याने मात्र परिसरात भीतीचे वातावरण असून शेतशिवारत नेहमीच नागरिक जात असल्याने या घटनेने मात्र धास्तावले आहे.
सदर घटनेबाबत वनविभागाला कळविण्यात आले आहे. वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याने मात्र जांभूळकार यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

(The Gadvishva) (Chimur) (Manemohali) (Tiger Attack) (Tadoba Tiger)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here