– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, १५ डिसेंबर : विनयभंग करणाऱ्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व २६ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. दिपक एकनाथ कुमरे (२४) रा. बोरीचक ता. आरमोरी जि.गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी दिपक हा १ ऑक्टोबर २०१९ रोजा फिर्यादी व त्याच्या सोबतीला तिची सासू व इतर चौघीजणी मातोश्री शाळा पिसेवडधा येथे ११ वाजता दरम्यान मजुरीच्या कामावर असतांना दुपारी ०१.०० वाजताच्या दरम्यान तिथे आला व आम्ही १९ लोक आहोत बाकी सर्व लोक गावाबाहेर थांबले आहेत तुम्ही आम्हाला जेवण बनवून द्या नाहीतर तुम्हाला ठार मारु अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून चौघीजणी स्वयंपाक बनवण्यास तयार झाल्या. यावेळी आरोपीने फिर्यादीस बोट दाखवून फक्त तू चल असे बोलला यावेळी फिर्यादीच्या सासूने ती एकटी कशी जाईल म्हणून तिच्या सोबत एकीला पाठवले. आरोपीने फिर्यादी व तिची सोबतीला घरी घेऊन गेला व फिर्यादीच्या खोली मध्ये नेत सोबतचीला बाहेर रहा असे म्हणत फिर्यादीसोबत विनयभंग करतांना दोघींनी आरडाओरड केली असता आरोपीने फिर्यादीच्या गळा दाबून पळून गेला. काही वेळाने गावकऱ्यांनी आरोपीला पकडले वे पोलीस पाटील यांच्या घरी नेले असता त्याच दिवशी गावातीलच दुसऱ्या महिलेवर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशा फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हा दाखल करून २ ऑक्टोबर ला अटक करण्यात आली.
पोलीस यंत्रणेने तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून बुधवार १४ डिसेंबर २०२२ रोजी आरोपी दिपक एकनाथ कुमरे (२४) रा. बोरीचक ता. आरमोरी जि. गडचिरोली यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यांनी कलम 354 (ब) भादवी कायदयान्वये दोषी ठरवुन ३ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. द्रव्यदंडापैकी २० हजार रूपये नुकसान भरपाई म्हणुन पिडीतेला देण्याचे आदेश देण्यात आले.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास मसपोनि/ अंजली मेवासींग राजपुत पोस्टे धानोरा यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.
(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (3 years imprisonment for molesting accused)(Hugo lloris)