सर्च व आदिवासी ग्रामसभा तर्फे डॉ. के. व्‍ही चारी स्‍मृती प्रित्‍यर्थ १५० गावात युवा खेळ स्‍पर्धेचे आयोजन

194

The गडविश्व
गडचिरोली, १७ डिसेंबर : सर्च संस्थे तर्फे गेल्या विस वर्षापासून धानोरा तालूक्‍यातील विविध गावात खेळ स्‍पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सर्च संस्था आणि आदिवासी ग्रामसभा तर्फे धानोरा तालूक्‍यातील चार विभागा मध्‍ये खेळ स्‍पर्धेचे आयोजन यावेळी केले जाणार आहे. रांगी विभाग मधिल आयोजन निमनवाडा येथे २० ते २२ ड‍िसेंबर दरम्यान खेळ होणार असून त्‍यामध्‍ये ३० गावे सहभागी होणार आहे. कारवाफा विभाग मध्ये हनपायली येथे २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान खेळ होणार असून त्‍यामध्‍ये ४५ गावे सहभागी होणार आहे. पेंढरी विभागामधे मोहगाव येथे ५ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे. त्‍यामध्‍ये ३२ गावे सहभागी होणार आहे. तर धानोरा क्‍लस्‍टर मधील खेळांचे आयोजन ११ ते १३ जानेवारी २०२३ दम्यान होणार असून ४० गावे सहभागी होणार आहे.
खेळ स्‍पर्धेमध्‍ये व्‍हॉलिबॉल, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक, गुणेल, आणि १०० मि रनिंग या खेळाचा सहभाग होणार आहे. अशी माहिती जीवन शिक्षण विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर पाटील यांनी दिली. खेळ आणि आदिवासीचे अतूट नाते आहे. राष्‍ट्रीय नाही तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरही खेळाडूची नावे चमकत आहे. आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. पण आरोग्‍याकडे दूलर्क्ष करून चालणार नाही. यासाठी या स्‍पर्धा घेतल्‍या जातात. खेळ आदिवासीच्‍या सांघिक भावनांचे प्रतिक आहे. प्रत्येकच विभागात खेळाच्या उदार्म्यान रात्रीला गावागातून येणारे आदिवासी कलाकार पारंपारिक न्‍यृत्‍याचे सादरिकरण करणार आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Naruto) (The Recruit) (Warhammer) (Bilawal Bhutto on Modi) (Avatar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here