विवीध तालुका क्लिनिकमध्ये ६० रुग्णांवर उपचार

255

The गडविश्व
गडचिरोली, १९ डिसेंबर : स्वतःचे पैसे खर्च करून आपण दारूच्या माध्यमातून विविध आजार विकत घेत असतो. दारू सेवनामुळे स्वतःबरोबर कुटुंबही व्यथित होत असल्याचे लक्षात येतात जिल्ह्यातील ६० रुग्णांनी मुक्तिपथद्वारे विविध तालुका मुख्यालयी सुरू क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतला आहे.
दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार आहे. यातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्हाभरातील अशा रुग्णांना तालुकास्थळी उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी १२ ही तालुक्यात व्यसन उपचार क्लिनिक सुरु करण्यात आले. यामुळे शहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना सुद्धा उपचार घेणे सुलभ झाले आहे. आठवडाभरात गडचिरोली येथील क्लिनिकला ९, देसाईगंज १६, एटापल्ली ९, चामोर्शी ८ व कोरची तालुका क्लिनिकला १८ रुग्णांनी भेट दिली.
यावेळी समुपदेशक यांनी रुग्णांना दारूची सवय कशी लागते, नियमितपणे औषधोपचार घेणे, दारुमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, धोक्याचे घटक आदींबाबत माहिती दिली. संयोजक यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम समजावून सांगत इतरही रुग्णांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. तालुका मुख्यालयी नियोजित दिवशी रुग्णांना उपचार मिळत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केला जात आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here