कुरखेडा : गेवर्धा ते अरततोंडी मार्ग खड्डेमय

291

– दुरुस्ती करण्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २२ डिसेंबर : तालुक्यातील प्रख्यात असलेल्या महादेवगड अरततोंडी हे हेमाडपंती देवस्थान असून येथे शिव पूजा केली जाते व पर्यटकांसाठी मोठा आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे महाशिवरात्रीला मोठा संख्येने भाविक येत असतात मात्र आता गेवर्धा ते अरततोंडी मार्ग पूर्णतः खड्डेमय झाला असल्याने हेमांडपंती ला जायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तालुक्यात अरतातोंडी येथील महादेवगडावर शिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यावेळी जत्रेचे स्वरूप पहावयास मिळतात मात्र येथे जाण्याकरिता असलेला गेवर्धा ते अरतातोंडी मार्ग हा खड्डेमय झाला असल्याने महादेवगडाला जायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित झाला असून या मार्गावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब लक्षात घेता हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी गुरनोली व अरततोंडी येथील नागरिकांनी केली आहे. गावकऱ्यांनी काही प्रमाणात गाव सहकार्यातून काही खड्डे बुजविले हे विशेष.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Kurkheda: Road from Gewardha to Artatondi is potholed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here