गडचिरोली : वाघाचे हल्ले सुरूच, पुन्हा एका महिलेचा बळी

1520

– हल्ला करणारी ती तर मोकाट वाघीण नाही ?
The गडविश्व
गडचिरोली, २३ डिसेंबर : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका वृद्ध महिलेचा बळी गेल्याची घटना शुक्रवार २३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ताराबाई लोनबले (६५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या जेप्रा येथील दोन महिला दिभना लगत असलेल्या अमिर्झा रोडवरील आपल्या शेत शिवारात सरपन गोळा करायला शुक्रवार २३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास गेल्या होत्या. दरम्यान सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवत ताराबाई लोनबले यांच्या नरडीचा घोट घेत ठार केले व २ किमी अंतरावर जंगल परिसरात फरफटत नेले.
घटनेची माहिती शेतात सोबत असलेल्या मुलीने गावकऱ्यांना दिली व शोधाशोध केली असता ताराबाईचा मृतदेह आढळून आला. दरम्यान याची माहिती वनविभाग व पोलिस स्टेशनला देण्यात आली असता वनविभाग कर्मचारी व पोलिस कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हल्ला करणारी ४ बछड्यांची ती मोकाट वाघीण तर नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असून दिवसेंदिवस मानवावरील हल्ले होत असल्याने वारंवार वाघाला जेरबंद करून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Tiger Attack) (Gadchiroli Forest) (Gadchiroli Forest Tiger Attack) (IPL

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here