– व्यवसाय शिक्षकाचे प्रश्न प्रलंबित, व्यवसाय शिक्षकाचे बाजारीकरण थांबवण्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २४ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील अतिदुर्बल, वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षक नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी धडक मोर्चा २६ डिसेंबरला काढणार आहेत.
राज्यात समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रणाची जबाबदारी असलेल्या समग्र कार्यालयामार्फत ही योजना शासनामार्फत पूर्णपणे अंमलबजावणी न करता महाराष्ट्र राज्य बाहेरच्या विविध खाजगी कंपन्या व त्रयस्थ संस्था यांच्यामार्फत कंपन्यांना निवड नफा कमविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असल्याचा आरोप संघटना करित आहे. याचा परिणाम राज्यातील गरीब अति दुर्बल व वंचित आदिवासी विद्यार्थ्यांच्या कौशल्याभिमुख व्यवसाय शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता ढासळली आहे .खाजगी कंपन्या व त्रस्त संस्था यांचा समग्र शिक्षा मधील अधिकाऱ्यांशी असलेले लागेबांधे व आर्थिक हितसंबंध यांचा व्यवसाय शिक्षण व्यवस्थेवर मोठा नकारात्मक परिणाम होत आहे. समग्र शिक्षा कार्यालयाच्या बाजारीकरण धोरणामुळे राज्यात शासकीय शाळेत माध्यमिक वर्गांना व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी त्यांचे पगार मासिक देयके तसेच विविध प्रात्यक्षिक खर्च सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून येणारी पिढी सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवणाऱ्या व्यवसाय शिक्षकावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणावर राज्याचे मोठे आर्थिक बजेट खर्च केले जाते परंतु नेमका हा पैसा जातो कुठे ? या प्रश्नाला अनुसरून संघटनेनेअनेक वेळा समग्र शिक्षा व मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना पत्रव्यवहार करूनही या ज्वलंत प्रश्नांना केराची टोपली दाखवली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी २६ डिसेंबर रोजी राज्याचे व्यवसाय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शोबराज कोंडे यांच्या नेतृत्वात राज्यातील तमाम व्यवसाय शिक्षकांचा महामोर्चा विधान भवन नागपूर येथे धडकणार आहे. आपल्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यातील व्यवसाय शिक्षकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कोषाध्यक्ष प्रशांत टोंगे, सचिव हरिश खान पठाण, अध्यक्ष विनोद नेवारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC)