– स्थानिक नागरिकांना अवागमन करण्यास होईल सोईस्कर, शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय
The गडविश्व
अहेरी, २४ डिसेंबर : तालुक्यातील रेपणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा गावातील नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून ७० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले. या पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन छल्लेवाडा गावातील नाल्यावार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
छल्लेवाडा येथील नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील स्थानिक नागरिकांना व शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार( Ajay kankdalwar ) यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतःनाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिली होते. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत तिमरम नाल्यावार पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले. छल्लेवाडा येथील जनतेला दिलेल्या ग्वाही पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अहेरी तालुक्यातील एकही नाल्यावर आजपर्यंत पूल वजा बंधारा बांधकाम करण्यात आले नाही मात्र माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्ष बनले तेंव्हा या नाल्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना अवागमन करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून दुसऱ्यादाच तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे. या पूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
या पूल वजा बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य, अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर, अँड.एच.के.आकदर, विलास बोरकर, गुलाब देवगडे, शंकर बासरकर, लक्ष्मण झाडे, राहुल सुंदिला, अशोक झाडे, वागू निमगडे, लक्ष्मण जनगाम, मनोहर बासरकर, रवि दुर्गे, वैकुंटम आकुदारी, नागेश ताटिपेली, महेश भगत, हनमंतू ठाकरे, प्रशांत गुरनूले, श्रीनिवास लेंडगुरे, मोंडी कोटरंगे, स्वामी ठाकरे, वसंत चव्हाण, विलास सिडाम, वासुदेव सिडाम, सुरेश ठाकरे, किष्टाया गुरनूले, नारायण कोटरंगे, श्रीहरी गुरजाला, रवि चव्हाण, रवि सोतकु, रजित सभावा, सुरेश चव्हान, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक, नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC)