पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन १४० नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची प्रशिक्षणाकरीता निवड

255

– गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘भव्य रोजगार मेळाव्याचे’ आयोजन.
The गडविश्व
गडचिरोली, २४ डिसेंबर : जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी “भव्य रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पाडण्यात आला.
या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील १४० बेरोजगार युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते, यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांचे मार्फत १४० नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व युवतींना नियुक्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.
यावेळी नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील. तसेच येणा­या सन २०१३ या नवीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक-युवतींसाठी १०,००० नवीन रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून द्यावे व त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे जीवनमान उंचवावे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५१२, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलिटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, इलेक्ट्रीशिअन १६७ , प्लंम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल डयुटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२ असे एकुण २,९७७ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १४०, कुक्कुटपालन ५३१, बदक पालन १००, शेळीपालन ८०, शिवणकला २४२, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण १०६२, टु व्हिलर दुरुस्ती ६४, मत्स्यपालन ८७, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ५९, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ४७४१ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर भव्य रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा., तसेच नितीन सेन गुप्ता, सेंटर हेड व हेमंत बन्सोड, पार्कसन्स स्किल इन्स्टीट्युट, नागपूर हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC) (Selection of 140 Nursing Assistant Women Candidates for Training through Police Dadalora Window)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here