मॅजिक बस तर्फे पवनी तालुक्यातील विविध गावात स्टडी कॉर्नर किट्सचे वाटप

209

The गडविश्व
गडचिरोली, २४ डिसेंबर : मॅजिक बस इंडीया फाउंडेशन स्केल प्रकल्प, तालुका पवनी तर्फे मॅजिक बस कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध शाळांमध्ये हर घर स्टडी कॉर्नर अभियान ५ ते २४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आला. सदर कार्यक्रम मॅजिक बस चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निक्की व तालुका प्रकल्प व्यवस्थापक विनोद शंभरकर यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला.
हर घर स्टडी कॉर्नर हा उपक्रम तालुक्यातील ५० गावातील ७३ शाळांमध्ये राबविण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ग ६ ते ९ च्या ८ हजार विद्यार्थ्यांना स्टडी कॉर्नर किट चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळा व विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद,व ५० गावातील मॅजिक बस समुदाय समन्वयक व मॅजिक बस शाळा साहाय्यक अधिकारी वसंत पोटे, भूषण कोकुडे, मोनाली धुर्वे, प्रेरणा वानखेडे, लक्ष्मी बनकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
(The Gadvishva) (Magic)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here