मुरुमगाव येथे दोन दिवशीय आधार कार्ड शिबिर संपन्न

292

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ डिसेंबर : तालुक्यातील मुरुमगाव येथील पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे जिल्हा पोलीस प्रशासन तर्फे दोन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव चे पोलीस प्रभारी अधिकारी जि.एन. आठवे, पोलीस तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी, उपनिरीक्षक गोगंले, पोलीस उपनिरीक्षक जारवल, दूगा मेजर, उसेंडी मेजर, आधार कार्ड केन्द्र ऑपरेटर संदीप किरमीरे गडचिरोली, सहयोगी प्रियंका सोनवणे,ऑपरेटर सिजनसिगं भक्ता मुरुमगाव उपस्थित होते.
या शिबिरात अतिसंवेदनशील विभागातील हिरंगे ग्रामपंचायत, सिदेंसूर, मुरुमगाव, पन्नेमारा ग्रामपंचायत, तूमळीकसा, मौजा गोटाटोला व महिला बचत गट मुरुमगाव, व शालेय विद्यार्थी चे आधार कार्ड बनवून देण्यात आले.
या मध्ये आभा कार्ड १०२, आयुष्यमान कार्ड ५८, ईश्रम कार्ड १२० व आधार कार्ड १२० या प्रमाणात नविन कार्ड बनवून देण्यात आले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Addhar Card Camp)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here