दारूविक्रेत्यांवर पथकाच्या माध्यमातून करणार कारवाई

187

-एटापल्ली मुक्तिपथ तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, ३१ डिसेंबर : एटापल्ली येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार ए. बी.भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तिपथ तालुका समितीच्या मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील अवैध दारू व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यासह दारू व तंबाखूची विक्री थांबविण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत शहरातील व गावातील अवैध दारूबंदी व तंबाखू बंदी करिता पथक गठित करून धडक कार्यवाही करणे, शाळा-महाविद्यालयात तंबाखूचे दुष्परिणामांची जनजागृती करणे, सर्व शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करणे, शहर संघटना गठीत करून अवैध दारूविक्री बंद करणे, ३१ डिसेंबरला दारूला नाही म्हणा कार्यक्रम आयोजित करणे, शहरातील मोठे दारू सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याचे नियोजन करणे, गावा-गावातील शाळांमध्ये शाळा कार्यक्रम घेऊन शाळा तंबाखूमुक्त करणे, व्यसन उपचार शिबिरे घेऊन दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी करणे इत्यादी मुद्द्यांवर विभागवार आढावा घेण्यात आला.
बैठकीला पोलिस उपनिरीक्षक धनगर, नगरपंचायतचे अधीक्षक शिवाजी रसाळ, डॉ. एल. डी. गुब्बावार, भगवंतराव महाविद्यालयाच्या डॉ. स्वाती मॅडम, प्राथमिक रुग्णालयाच्या समुपदेशक सुधाकर श्रीरामे, तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून ठाकूर, विस्तार अधिकारी एस.एस.साळवे, बचतगट समन्वयक वंदना गावडे, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मल्लेवार, तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे आदी उपस्थित होते.

The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Al Nassr) (Real Madrid) (Real Madrid cf) (Rishabh Pant) (Happy New Year 2023) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here