– शहीद वीर बाबुराव शेडमाके क्लब मुखडीटोला ( मछली ) च्या वतीने भव्य स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी, ३१ डिसेंबर : तालुक्यातील मुखडीटोला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके क्लब व्हॉलीबॉल मछली यांच्या वतीने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्हॅलीबॅल क्रीडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दुसरा पारितोषिक माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या व तिसरा पारितोषिक जि.प.प्राथमिक शाळा मुखडीटोला गणेश तलांडे व सरोजित हलदार यांच्या कडून असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विजय कुसनाके होते.
यावेळी जिजाबाई मडावी सरपंचा ग्रामपंचायत गोमणी, शुभम शेंडे सदस्य ग्रामपंचायत गोमणी, गणेश तलांडे ग्रामपंचायत सदस्य गोमणी, दिनेश उरेत माजी सरपंच ग्रामपंचायत गोमणी, साईनाथ चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत गोमणी, उमेशभाऊ कडते सरपंच ग्रामपंचायत आंबटपल्ली, सलामभाई शेख, प्रमोद गोडसेलवार व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.