गडचिरोली : १०० टक्के तंत्रज्ञानाचा वापर करून पहील्यांदाच होणार पोलीस शिपाई व चालक पदाची भरती प्रक्रिया

3330

– रविवार वगळून होणार शारीरिक चाचणी प्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, ३१ डिसेंबर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या १४००० पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र policerecruitment2022.mahait.org या वेबसाईवर उपलब्ध झालेले असून, गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ३४८ पोलीस शिपाई व १६० चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया ही ०२ जानेवारी २०२३ पासुन गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार असून, पोलीस शिपाई पदाकरीता एकुण १९,९०३ आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यामध्ये पुरुष १४६७८ व महिला ५२२५ आहेत. तसेच चालक पोलीस शिपाई पदाकरीता एकुण ५५८१ आवेदन अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये पुरुष ५३१६ व महिला २६५ आहेत. असे एकुण २५,४८४ आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
गडचिरोली पोलीस दलाच्या इतिहासात पहील्यांदाच १००% आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन यावर्षीची पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यामध्ये बायोमॅट्रीक पद्धतीने उमेदवारांची नोंदणी, इलेक्ट्रॉनीक आधारीत उंची व छाती मोजमाप, आरएफआयडी आधारीत १६०० मीटर व १०० मीटर धावणे आणि इन्फ्रारेड (IR) तंत्रज्ञानाचा वापर करुन गोळाफेकच्या लांबीचे मोजमाप करुन सदरची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच ०२ ते ०४ जानेवारी २०२३ रोजी पर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक चाचणी होणार असून, ५ जानेवारी २०२३ ला चालक पदासाठी महिला उमेदवाराची शारीरिक चाचणी प्रक्रिया होणार आहे. सोबतच ०६ ते १४ जानेवारी २०२३ पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक चाचणी होणार असून, शेवटचे तीन दिवस १५ ते १७ जानेवारी २०२३ रोजी पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवाराची शारिरीक चाचणी प्रक्रिया होणार आहे. सदरची शारीरिक चाचणी प्रक्रिया ही रविवार दिवस वगळून होणार आहे.
आपले प्रवेशपत्र policerecruitment2022.mahait.org या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करुन घ्यावे, तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या शारीरिक चाचणीची तारिख लक्षात घेऊन भरती प्रक्रियेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक कागदपत्रानिशी उपस्थित राहावे. तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये व कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. ८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय / पोस्टे/उपपोस्टे / पोमकें येथे माहिती द्यावी, असे ” आवाहन गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी केलेले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli news Updates) (police Bharti 2022) (Al Nassr) (Real Madrid) (Real Madrid cf) (Rishabh Pant) (Happy New Year 2023) (Police Recruitment 2022)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here