५७ मद्यपीना दारूचे दुष्परिणाम आले लक्षात

200

– विविध तालुका क्लिनिकतुन घेतला उपचार
The गडविश्व
गडचिरोली, ५ जानेवारी : दारूच्या व्यसनामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक हानी होत असल्याची बाब लक्षात येताच ५७ मद्यपीनी विविध तालुक्यास्थळी असलेल्या व्यसन उपचार क्लिनिकला भेट दिली व उपचार घेतला.
व्यसन हा एक आजार असून यावर लवकर उपचार घेणे गरजेचे असते. गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यातील रुग्णांना हे उपचार घेणे सोयीस्कर व्हावे, यासाठी मुक्तीपथने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्यसन उपचार क्लिनिक सुरू केली आहे. मागील आठवड्यात नियोजित दिवशी घेण्यात आलेल्या क्लिनिकच्या माध्यमातून गडचिरोली १६, देसाईगंज १९, एटापल्ली ११, अहेरी ६, चामोर्शी ५ अशा एकूण ५७ रुग्णांनी उपचार घेतला.
क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना दारूची सवय कशी लागते, धोक्याचे घटक, शारीरिक दुष्परिणाम, मानसिक तणाव आदींची माहिती देत तज्ञांकडून समुपदेशन केले जाते. सोबतच औषध उपचारासह योग्य ते मार्गदर्शन केले जाते. एवढेच नव्हे तर एकदा उपचार घेतलेल्या रुग्णांचा नियमित पाठपुरावा केला जातो. दारूचे व्यसन सोडण्यास इच्छुक रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन मुक्तीपथ अभियानातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here