प्रश्नमंजुषातून विद्यार्थ्यांना कळले व्यसनाचे दुष्परिणाम

141

-अतिदुर्गम भागातील २७४८ विद्यार्थ्यांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, ५ जानेवारी : शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांसह दारूचे दुष्परिणाम लक्षात यावे, या उद्देशाने मुक्तीपथ अभियानाच्या वतीने अतिदुर्गम अशा एटापल्ली तालुक्यातील ३० शाळांमध्ये जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला. याअंतर्गत झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण २७४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दारू, तंबाखू ,खरा, सिगारेट आदींमुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात व विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी कायद्यांची माहिती असावी या उद्देशाने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येत आहे. सदर जाणीवजागृती कार्यक्रम तीन टप्प्यात पार पडणार आहे. शाळा पातळी, क्लस्टर पातळी व जिल्हा पातळीवर जागृती संबधात विविध कार्यक्रम होणार असून शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व अंतिम टप्प्यात क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागामध्ये वसलेल्या विविध ३० शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. यात शासकीय आश्रमशाळा जारावंडी, भगवंतराव आश्रमशाळा भापडा, जि.प.शाळा जारावंडी, जि.प. शाळा भापडा, जि.प.शाळा दिंडवी, आश्रमशाळा जांभिया,भगवंतराव आश्रमशाळा गरदेवाडा, जि.प.शाळा गटा, जि.प. शाळा जाजावंडी, जि.प. शाळा नेंडेर, शासकीय आश्रम शाळा कसनसुर, विनोबा आश्रमशाळा कोटमी, श्रीराम आश्रमशाळा घोटसुर, शासकीय आश्रमशाळा हालेवारा, जि.प.शाळा कसनसुर, स्वामी समर्थ आश्रमशाळा उडेरा, जि.प.शाळा उडेरा, जि.प.शाळा येमली, भगवंतराव आश्रमशाळा बुर्गी, जि.प.शाळा बुर्गी, विनोबा आश्रमशाळा हेडरी, जि.प.शाळा परसलगोंदी, जि.प.शाळा पूरसलगोंदी, जि.प.हायस्कुल एटापली, भगवंतराव आश्रमशाळा एटापली, शासकीय आश्रमशाळा तोडसा, विनोबा आश्रमशाळा पंदेवाही, विनोबा आश्रमशाळा गेदा, जि.प.शाळा चन्दनवेली, जि.प. शाळा जीवनगटा या शाळांचा समावेश आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २७४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना दारू व तंबाखूचे शारीरिक, आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख व मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार, प्रेरक रवींद्र वैरागडे, स्पार्क कार्यकर्ता रुणाली कुमोटी यांनी केले. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मिळून प्रश्नमंजुषेचा टप्पा यशस्वी पार पाडला.

The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Crystal Palace vs Tottenham) (Barcelona) (Leeds United vs West Ham) (Varisu Trailer) (Ssc.nic.in) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here