इंदाराम येथे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन

355

– नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी
The गडविश्व
अहेरी, ५ जानेवारी : तालुक्यातील इंदाराम येथे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग गडचिरोली अंतर्गत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कार्य काळात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली. असुन सदर विहीर व टाकीचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदाराम येथे गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नाही त्यामुळे गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नव्हते मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन संपन्न झाले. त्यामुळे आता टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला सौ. वर्षाताई पेंदाम सरपंच ग्राम पंचायत इंदाराम, वैभव कंकडालवार ग्रा.पं.उपसरपंच इंदाराम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यामन ग्रा. प. सदस्य, शालनीताई कांबळे ग्राम पंचायत सदस्या, शाकीर शेख ग्राम पंचायत सदस्य उमेश कोरेत, किशोर भाऊ तेलंगे तेजूभाऊ दुर्गे, श्रीनीवास कोत्तावडलावार, एस बी तुमडे, मुसली आत्राम, जयराम आत्राम, भिमा पेंदाम, लालू मडावी, बिच्चू मडावी, अनिल पेंदाम, साईनाथ गौरारप, साईनाथ वड्डे, शिवराम पेंदाम, संतोष गौरारप, अशोक पेंदाम, अजय अर्का, मल्लेश गौरारप, रोशन शामलवार, ग्राम पंचायत शिपाई इंदाराम लक्ष्मण आत्राम, गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here