कुंमकोटची मंडई झाली तंबाखूमुक्त

175

– मागील तीन वर्षांपासूनची परंपरा कायम
The गडविश्व
गडचिरोली, ७ जानेवारी : कोरची तालुक्यातील कुंमकोट येथे ४ जानेवारी रोजी मंडईचे आयोजन करण्यात आले. या मंडईला पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी उसळली. ही मंडई राज राजेश्वरी राजमाता देव मंडई समिती व मुक्तीपथ गावसंघटना यांच्या प्रयत्नातून तंबाखु विक्रीमुक्त मंडई झाली.
या गावात राजमाता चे अतिशय जुने मंदिर आहे. कुंमकोट येथील मंडई प्रसिद्ध असल्याने दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे. राजमातेच्या दर्शनाला गडचिरोली, गोंदीया, चंद्रपुर, भंडारा, नागपुरसह अनेक ठिकाणाहून भक्तजणांनी हजेरी लावली होती. या जत्रेत खेळणी, झुले, विविध दुकाने लावण्यात आली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली तंबाखूमुक्त मंडईची परंपरा यंदाही देवस्थान समितीने कायम ठेवली. यासाठी माजी उपसभापती सदारामजी नुरुटी, माजी जिप सदस्य रामसुराम काटेंगे, वादुराम नुरुटी, मुक्तीपथ तालुका संघटक निळा किन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली ६० गावाच्या समीतीने पाम्पलेटवर तंबाखुमुक्त मडंई घोषीत करुण जनजागृती केली. सोबतच मंडई दरम्यान बॅनर, पाम्प्लेटच्या माध्यमातून तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यात आला. दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे ही मंडई तंबाखूमुक्त करण्यात देवस्थान समिती व गाव संघटनेला यश आले.
यावेळी कोरची नपच्या नराध्यक्षा हर्षलता भैसारे, बिडीओ फाये, मनोज अग्रवाल, कुळसंगे ,आशिष अग्रवाल, सरपंच बुधराम फुलकवर, उपसरपंच होळी , ग्रामसेवक काशीवार ,राहुल अंबादे, सियाराम होळी, अमोल बरतते, पोलीस स्टेशनचे पथक , गावातील प्रतिष्ठीत सरदारसिंग नुरुटी, दुरुगसाय होळी, दानुराम होळी, जनायबाई सुखदेव कल्लों, शामबाई नुरुटी, प्रभाताई नुरुटी, शालु नुरुटी,रमसोबाई बोगा, रेवताबाई होळी, राम होळी, आशिष कल्लों, विष्णु नुरुटी, विजय होळी, अजय कल्लो, शंकरभाऊ जनबंधु आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here