The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १३ जानेवारी : स्थानिक जि.प. हायस्कूल व उच्च माध्यमिक शाळा येथे आनंद मेळावा साजरा करण्यात आला. या आनंद मेळाव्या चे उद्घाटन प्राचार्य कोहाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आनंद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
शिक्षक विद्यार्थ्यांना शालेय जीवनात चांगल्या सवयी लावाव्यात यासाठी शिक्षणबरोबर विविध उपक्रम राबवित असते, असाच उपक्रम जिल्हा परिषद हायस्कूल व उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा आयोजित केला. विद्यार्थ्यांना फक्त्त मार्गदर्शन करून चालणार नाही तर प्रत्यक्ष उपक्रम सुद्धा राबवावुन विद्यार्थ्यांना खरी कमाई काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव संपूर्ण विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल च्या पटांगणात आयोजित केलेल्या आनंद मेळावातून घेतला. या आनंद मिळाव्यात विविध खाद्यपदार्थाचे १६ स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये गुपचूप, ढोकळा, चनाचिवडा, आलू भजे, चहा, पाणी अश्या विविध स्टॉल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कमाई केली.
या आनंद मेळाव्यात शिक्षकाच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक यांनी या आनंद मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (former)