३२ हजारांचा मोहफुलाचा सडवा नष्ट

203
The गडविश्व
गडचिरोली, १५ जानेवारी : देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव शेतशिवारात आढळून आलेला ३२ हजार ३०० रुपयांचा मोहफुलाचा सडवा व साहीत्य नष्ट केल्याची अहिंसक कृती गाव संघटना व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या केली.
पिंपळगाव येथे जवळपास ५ विक्रेते दारू  विक्रीचा अवैध व्यवसाय करीत आहेत. शेतशिवारात हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहीतीच्या आधारे गाव संघटनेचे सदस्य व मुक्तीपथ तालुका चमूने शेतशिवारात शोधमोहीम राबविली असता, दोन ठिकाणी लपवून ठेवलेला मोहफुलाचा सडवा मिळून आला. जवळपास ३२ हजार ३०० रुपयांचा सात ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here