कुरखेडा : मंडई दरम्यान भरणाऱ्या अवैध कोंबडे बाजारावर आशीर्वाद कुणाचा ?

972

– कारवाई शून्य, कोंबडे बाजारावर चालतो जुगार, अनेकांना जडले व्यसन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १७ जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मंडईचे आयोजन केल्या जाते. मात्र या मंडई दरम्यान बंदी असलेला कोंबडे बाजार सर्रासपणे भरवून जुगार खेळला जात असल्याचे बोलल्या जात असून अशा अवैध कोंबडे बाजारावर आशीर्वाद कुणाचा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुरखेडा तालुक्यात प्राचीन संस्कृती जपत धान कापणी झाल्यावर मंडई चे आयोजन केल्या जाते. परंतु कुठेतरी या पारंपरिक जत्रेला अवैध व्यवसायकांची नजर लागल्याचे दिसून येत आहे. मंडई दरम्यान कोंबडे बाजाराला परवानगी आहे अशी अफवा पसरवून मंडई चा नावाखाली अवैध रित्या कोंबडे बाजार सर्रासपणे भरविल्या जात असल्याचा प्रकार तालुक्यात दिसून येत आहे. पोलीस स्टेशन पुराडा अंतर्गत येणार्‍या सोनसरी येथे अवैधरित्या कोंबडे बाजार चक्क तीन दिवस भरविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून यावर मात्र कारवाई करणारे अधिकारी मोन धरून बसलेले होते त्यामुळे त्या कोंबडे बाजाराला अधिकाऱ्यांचे छुपी संमती तर नाही ना ? खरंच या कोंबडे बाजाराला परवानगी आहे काय ? हा अवैध कोंबडे बाजार कुणाच्या आशीर्वादाने भरविल्या जातो हा संशोधनाचा विषय असून यावर कारवाई का होत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कोंबडे बाजारावर लाखोंचा जुगार खेळला जातो तसेच कोंबडे बाजारावर बंदी आहे तरीसुद्धा काही भागात छुप्या मार्गाने कोंबडा बाजार भरविल्या जातो. त्यामुळे आजच्या युवा पिढीवर याचा एक वेगळाच प्रादुर्भाव पडताना दिसून यात आहे. अनेकजण या कोंबडा बाजारावर हजारोंचा जुगार खेळण्याच्या आहारी गेले आहे. मंडई दरम्यान भरविण्यात येणाऱ्या कोंबडे बाजारावर कोणाचीच वचक नाही काय ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (JEE Main 2023 Admit Card) (PSG) (Australian Open) (The Last of Us TV series) (OpenAI) (Kurkheda: Who’s blessing on the illegal chicken bajarthat takes place during Mandi)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here