The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २५ जानेवारी : विद्यार्थी व्यसनाकडे वळू नयेत यासाठी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाकरोंडी येथे तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित प्रोजेक्टरच्या मध्यामापासून लघुपट दाखवून विद्यार्थ्यांना जागृत करुण सावधान केले. तंबाखु सेवनामुळे शरीरावर काय परिणाम होतात, कसे होतात आणि मनुष्य कोणकोणत्या रोगाना बळी पडतो याची सविस्तर माहिती देवून तंबाखू सेवन करणार नाही याकरिता सर्वांना शपथ दिली. तसेच तंबाखू विरोधी कोटप्पा कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ. एच. आर. भुरे होते तर मार्गदर्शक म्हणूण इंडियन डेंटल असोसियनचे प्रकल्प समनवक सतीन अंकलू, आकाश बनकर, गिरीश बांगळे, गितेश बांगळे यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. तसेच गेडाम, जुआरे, कू. बाळबुद्धे मॅडम, कू. वासनिक मॅडम, कु. चांदेवार मॅडम, भाकरे, म्हाशाखेत्री, वैद्य, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मेश्राम यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लांडगे अधीक्षक, अधिक्षीका कु. खोब्रागडे यांनी विशेष प्रयत्न केले.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (UPSSSC PET Result) (Southampton vs Newcastle) (Adani) (Bundesliga) (STA vs THU)