-एटापल्ली तालुक्यातील १० शाळांची निवड
The गडविश्व
गडचिरोली, २८ जानेवारी : कायद्याने बंदी असूनही अवैधरित्या विक्री होणाऱ्या व शरीरास हानिकारक अशा दारू, तंबाखूजन्य पदार्थांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुक्तीपथ अभियानाच्या वतीने प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात एटापल्ली तालुक्यातील विविध केंद्रावर क्लस्टरस्तरीय स्पर्धा पार पडली. यातून १०शाळांची तालुकास्तरावर निवड करण्यात आली आहे.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाच केंद्रातील १० शाळाची तालुका पातळी प्रश्नमंजुषा विचार कार्यक्रम कार्यशाळा करिता निवड झाली. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शासकीय आश्रम शाळा जांभिया, जिल्हा परिषद शाळा नेंडेर, भगवंतराव आश्रम शाळा बूर्गी, जिल्हा परिषद शाळा बुरगी, जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली, जिल्हा परिषद शाळा गेदा, शासकीय आश्रम शाळा हालेवारा, जिल्हा परिषद शाळा कसंनसुर, शासकीय आश्रम शाळा जारावंडी, जिल्हा परिषद शाळा जारावंडी या १० शाळांची तालुका पातळी प्रश्नमंजुषा विचार कार्यक्रम कार्यशाळा करिता निवड झाली आहे.
येणारी पिढी व्यसनमुक्त व्हावी, विद्यार्थ्यांना व्यसन लागू नये, विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम कळावे या उद्देशाने मुक्तीपथ अभियानाच्या वतीने जिल्हाभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनतर पाच केंद्रावर ही स्पर्धा पार पडली. या उपक्रमाचे नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार, मुक्तीपथ टीमने केले. यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख, विविध शाळांच्या शिक्षकांनी सहकार्य केले.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath)