– वटेली येथील स्व.दलसू सुकरु मडावी यांचा मृत्यू
The गडविश्व
भामरागड, २९ जानेवारी : तालुक्यांतील वटेली येथील दलसू सुकरु मडावी (६१) यांचे प्रकृती ठीक नसल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मडावी यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अडचण निर्माण झाकी होती. सदर बाब माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहीत होताच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत मृतक दलसू सुकरु मडावी यांना स्वगृही सोडण्यासाठी अहेरी नगरपंचयातची वैकुंठरथ बोलावून त्यांना भमरागड तालुक्यातील वटेली येथे पाठविण्यात आले व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विनोद रामटेके, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे यांनी रुग्णालयात जावून भेट घेवुन सहकार्य केले.