जारावंडी आश्रम शाळेत “नवचेतना गुरुकृपा उपक्रम” पालक मेळावा संपन्न

607

The गडविश्व
एटापल्ली, ३१ जानेवारी : तालुक्यातील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे गणराज्य दिनाचे औचित्य साधून नवचेतना गुरुकृपा उपक्रम पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. सखाराम हिचामी (प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरी) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वासुदेवराव कोडापे तर विशेष अतिथी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र जारावंडी चे डॉ. कोटवार, सरपंचा सपनाताई कोडापे, शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष सुधाकरजी टेकाम, हरिदासजी टेकाम, शाळेचे मुख्याधापक बी. एम. पंधरे, रमेश दुग्गा, अशोक नरोटे, मनोज मडावी, यशवंत नरोटे, सुरेश मडावी, अन्नपुर्णा मोहुर्ले, देवरी मडावी, सचिन गेडाम, जि. एल. लोखंडे, हे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमांना माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर वाणीतून स्वागत गीत गाऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले. शाळेचे मुख्याधापक बी.एम.पंधरे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून भविष्यवेधी शिक्षण व नवचेतना उपक्रम अंतर्गत शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत भविष्यवेधी शिक्षणामुळे विधार्थामध्ये घडून आलेला आमुलाग्र बदल विविध उदाहरणाच्या माध्यमातून विषद करीत शैक्षणिक विकासात पालकाची भूमिका या विषयी विस्तृत विवेचन केले.
यावेळी उन्हाळी सुट्टी कालवधीत विद्यार्थ्यांचे विशेष शिकवणी वर्ग आयोजनाबाबत पालकासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि पालकांनी समती दर्शवली. तसेच ए. एम. वाटगुरे (उ.मा. शि) यांनी १० वी व १२ वी नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करीयरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. कोटवार व ‘कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. हिचामी यांची समायोचीत भाषणे झाली.
पालक मेळाव्याचे औचित्य साधून विधार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने बहारदार सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते या मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणाची उधळन करीत सर्वाना मंत्रमुग्ध केले. यावेळी शैक्षणिक प्रगतीबाबत प्रोजेक्टर च्या माध्यमातून भविष्यवेधी शिक्षण उपक्रमातील विधार्थांचे Video Clip दाखवण्यात आले. विषय मित्रांनी भविष्यवेधी शिक्षणाची उपयुक्तता आपल्या सादरीकरणातून रेखाटण्याचा प्रयत्न केला. यावेळी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व विविध स्पर्धामध्ये आपला ठसा उमठवीणाऱ्या गुणवंत विद्यर्थ्यांचा पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वासुदेवराव कोडापे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षणाचे महत्व विषद करून विधार्थाना भविष्यात उपयोगी पडेल असे मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. बारसागडे (माध्यमिक शिक्षक) यांनी तर आभार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. बी. ढोबळे, एच. बी. गेडाम, कु. भुईभार, कु, काटेंगे, एस. एन. गेडाम, एम. के. गेडाम, सौ. राणा, सौ. लीना, वाटगुरे, आर. एम. मुंजम, आर. पी. मादरबोईना, मैनु आतला, जे. एम. चौधरी, सी. के. एम. मेश्राम (अधीक्षिका), चंदू पोटावी.सी.डी.मेश्राम नाजूक काशीवार, मनिराम सडमेक, वाघ, बोरुले, मोहुर्ले, माने, अथक परिश्रम घेतले. कु. सडमेक, कु. कोडापे, पंकज रायपुरे, रामचंद्र मडावी व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी सहकार्य केले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Andhra Pradesh Capital) (Economic Survey 2023) (February) (Priyanka Chopra) (Joao Cancelo) (The Last of Us)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here