– शेतकऱ्यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ जानेवारी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे सातबारा आँनलाईन करूनही खरेदी केंद्राने खरेदी केली नाही. प्रत्येक केंद्र वेगवेगळे कारण देत असले तरी आजही बळीराज्याचे धान तसेच साठविले आहे. अशातच शासनाची खरेदी मुदत ३१ जानेवारी २०२३ असल्याने बळीराज्याचे धान्य न घेतल्यास बँक, सावकार, मुलाबाळाचे शिक्षण, लग्न कसे करायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला असल्याने शेतकऱ्यांच्या धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय धानोरा यांच्याकडे निवेदनातुन केली आहे.
धानोरा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शेतीचे उत्पादन घेऊन आवश्यक कागदपत्रासह ७/१२ऑनलाईन करून खरेदी संकलन केंद्र दूधमाळा येथे धान विक्री करीता नेले असता धान खरेदी करण्यास दूधमाळा केंद्राने धान्य नकार देण्यात येत आहे. त्यामुळे बँकेचे पीक कर्ज व घरगुती व आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. खरेदी केंद्रास मुदत वाढ देवून शेतकऱ्याचे धान खरेदी करण्यात यावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी ३१ जानेवारी रोजी व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय धानोरा यांना दिलेल्या निवेदनातून केली. निवेदनाची प्रत तहसीलदार तहसील कार्यालय धानोरा, व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित संकलन केंद्र दूधमाळा यांना दिले.
निवेदन देताना शिवराम सिताराम दुगा, मनीराम केशव करंगामी, प्रभुदास सावजी तोफा, दामजी खंडू दरो, देवराव दुगा, हल्दीराम माधुरीचा मी, सोमजी खंडू दरो , रेमाजी गणू कुमोटी ,रामदास भाऊजी तोफा आदी शेतकरी उपस्थित होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Dhanora) (Dhan Vikri)