दारूचे दुष्परिणाम जाणवताच २६ जणांनी घेतला उपचार

150

-एटापल्ली, चामोर्शी व अहेरी तालुका क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली, ४ फेब्रुवारी : दारूचे व्यसन धोकादायक ठरताच एटापल्ली, चामोर्शी व अहेरी तालुक्यातील २६ रुग्णांनी तालुका मुख्यालयी सुरु असलेल्या तालुका क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. औषधोपचारासह समुपदेशन करीत दारूच्या व्यसनापासून दूर होण्याचे आवाहन करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर तालुका मुख्यालयीच उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तिपथ अभियानाच्या वतीने जिल्हाभरातील बाराही तालुक्यात नियोजित दिवशी तालुका क्लिनिक घेतली जाते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी उपचार घेऊन दारूमुक्त झाले आहेत. नुकतेच गुरुवारी एटापल्ली येथील क्लिनिकमध्ये ६, शुक्रवारी चामोर्शी १० व अहेरी तालुका क्लिनिकतुन १० अशा २६ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा दर्शवली आहे. या रुग्णांना तज्ञ समुपदेशानी दारूचे व्यसनाचे दुष्परिणाम, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदी बाबी पटवून दिले. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या इतरही रुग्णांनी तालुका क्लिनिकचा लाभ घेण्याचे आवाहन मुक्तिपथ तर्फे करण्यात आले आहे.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (CA Foundation Result) (Juventus vs Lazio) (Viswanath) (Michael movie Review) (JEE Mains Answer Key 2023) (The Last of Us)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here