The गडविश्व
ब्रम्हपुरी (Bramhapuri), ६ फेब्रुवारी : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो वाहन पलटून झालेल्या भीषण अपघातात ३१ जण जखमी तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार ६ फेब्रुवारी रोजी ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ दुपारच्या सुमारास घडली.
रणमोचन येथील दोनाडकर व आप्त परिवार हे मालवाहक टेम्पो वाहनाने लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नातेवाईकांकडे नामकरण विधीच्या कार्यक्रमाला जात असताना ब्रम्हपुरी येथील टिळक नगर दत्त मंदिराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्यामुळे गाडी उलटली. या अपघातात ३१ जण जखमी झाले असून महिला व बालकांचा यात समावेश आहे. अपघात होताच वेळीच घटनास्थळाजवळील नागरिकांनी पलटी वाहनाला उभे करून जखमींना वाहना बाहेर काढून उपचाराकरीत दवाखान्यात दाखल केले. जखमींवर प्रथमोपचार करुन यातील गंभीर जखमी असेलेले प्रियंका दोनाडकर, प्रमिला भरें, रागिना बुराडे, जागृती दोनाडकर, योगिता दोनाडकर, अनुसया राऊत, ज्योत्सना बुराडे, आदेश बुराडे, व आदींना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पाठविल्याची माहिती आहे. तर इतरांवर ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Guru Ravidas Jayanti 2023) (Pat Cummins) Thaipusam) (Steve Smith) (JEE Mains Answer Key 2023) (Chelsea) (PSG) vs Toulouse) ( Accident)